Site icon e लोकहित | Marathi News

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत हायहोल्टेज ड्रामा! उमेदवारी न दिल्याने राहुल कलाटे करणार बंडखोरी

Chinchwad Vidhan Sabha by-election high-level drama! Rahul Kalate will rebel for not giving candidature

पुण्यात चिंचवड व कसबा विधानसभा पोट निवडणूकीचे धुमशान वाजत आहे. चिंचवड पोटनिवडणूकीसाठी ( Chinchwad Election) भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र लक्ष्मण जगताप यांचे मोठे बंधू शंकर जगताप यांनी सुद्धा आपल्या वहिनींच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे. जगताप कुटुंबाकडून राजकीय हायहोल्टेज ड्रामा सुरू होतोय तोच महाविकास आघाडीमध्ये देखील राजकीय नाट्याला सुरवात झाली आहे.

काँग्रेससाठी धक्कदायक बातमी! बाळासाहेब थोरात यांनी दिला राजीनामा

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कडून नाना काटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सुरवातीपासून या जागेसाठी नाना काटे व राहुल कलाटे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र अचानक राष्ट्रवादीने नाना काटे यांना संधी दिली आहे. दरम्यान नाराज झालेले राहुल कलाटे आता बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

“आदिलमुळे माझ्या आईच निधन झालं”, राखी सावंतचा खळबळजनक खुलासा

आज समर्थकांसोबत मोठी रॅली काढत ते अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही तर कलाटे बंडखोरी करणार. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मध्यंतरी ते म्हणाले होते की, ” 2014 आणि 2019 मध्ये मी चिंचवडच्या जनतेसमोर उमेदवार म्हणून गेलो आहे. मात्र जर महाविकास आघाडीने जनतेचं काम केलं तर त्यांच्याकडून मी जनतेसमोर जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. चिंचवड मतदारसंघात सर्वांचीच ताकद आहे. सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेतला तर त्याचा या निवडणुकीला फायदा होणार आहे. मात्र मविआच्या त्यांच्या निर्णयाची मी वाट पाहणार आहे. “

ब्रेकिंग! राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटेंना उमेदवारी!

मात्र राष्ट्रवादी ने उमेदवारी न दिल्याने त्यांनी आपली राखून ठेवलेली खेळी खेळायला सुरवात केली आहे. महाविकास आघाडी मध्ये पडलेली ही वादाची ठिणगी आणि दुसरीकडे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap) यांच्या घरातच सत्तेवरून एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले ‘दिर- भावजय’ यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक रंजक होणार आहे.

‘या’ स्पर्धांना क्रिकेटर्सची पसंती टिकणार नाही; आयपीएल सुद्धा होणार बंद?

Spread the love
Exit mobile version