दौंड: सध्या दौंडमधील चिरेबंदी वाड्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. दौंड तालुक्यातील खामगाव या ठिकाणी निलेश जगताप यांनी चिरेबंदी वाडा २५०० चौरस मीटर मध्ये बांधला आहे. हा चिरेबंदी खूप आकर्षक असल्याने लोकांच्या पसंतीती उतरत आहे. अनेक लोक लांबून लांबून हा वाडा पाहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे या वाड्याची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे.
RRR ला ऑस्कर मिळणार? गोल्डन ग्लोबच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत एस.एस.राजामौलीचा चित्रपट!
माहितीनुसार, निलेश जगताप यांना घर बांधायचं होतं मात्र त्यांना जरा वेगळ्या पद्धतीने घर बांधायचं होत. मग त्यांच्या डोक्यात ही वाडा बांधण्याची संकल्पना आली आणि त्यातून त्यांनी हा २५०० चौरस फुटाचा चिरेबंदी वाडा बांधला आहे.
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
हा वाडा एकदम पुरातन पद्धतीने बांधण्यात आला आहे. त्याच्या आतील वस्तू देखील अत्याधुनिक आहेत. या वाड्याची खासियत म्हणजे हा वाडा बाहेरून पहिला तर दगडाचा वाडा वाटतो आणि आतून पहिला तर सिमेंटचे घर वाटतो.