आपल्या गजब फॅशनमुळे प्रसिद्धीस आलेली उर्फी जावेद ( Urfi Jawed) व भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. उर्फीच्या कपडे न घालण्यावरून चित्रा वाघ यांनी तिच्यावर टीका केली होती. तसेच पत्रकार परिषद घेत ‘असला नंगानाच महाराष्ट्रात चालणार नाही’ असे सांगितले होते तसेच तिला अटक करण्यात यावी अशी पोलिसांकडे मागणी केली होती. दरम्यान उर्फी जावेद विरुद्ध पत्रकार परिषदा घेणे महागात पडणार आहे.
ब्रेकिंग! राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड
चित्रा वाघ यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली आहे. यामुळे चित्रा वाघ ( Chitra wagh) अडचणीत येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सध्या शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता चालू आहे. उस्मानाबाद ( Usmanabad) जिल्ह्यालाही ती आचारसंहिता लागू आहे. मात्र असे असताना देखील चित्रा वाघ यांनी तुळजाभवानी मंदिरात भाजपचे पदाधिकारी यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.
मोठी बातमी! आमदार बच्चू कडू यांचा अपघात
असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उस्मानाबाद दौऱ्यावर असताना तुळजाभवानीचे दर्शन घेणे चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान उर्फी जावेद सुद्धा ट्विट करत चित्रा वाघ यांना डिवचण्याचे काम करत आहे.
दिल्लीमधील महिलेवर पुण्यात बलात्कार; उपचार करण्यासाठी आली होती परंतु…