
मागच्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेते महापुरुषांबद्दल काहीही बोलत आहेत. यामध्येच आता चित्र वाघ यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले होत. त्यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत तुलना केली होती. त्यांनतर त्यांच्यावर सर्व स्तरांमधून जोरदार टीका होत आहे. दरम्यान, आता याबाबत स्वतः चित्र वाघ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
एका रात्रीत बनला लखपती, तरुणाला ७० लाखांची लागली लॉटरी
याबाबत चित्र वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्या म्हणाल्या ‘मी कोणाचीही तुलना नाही केली. त्यांची जागा कुणीच घेवू शकत नाही’ अशी सारवासारव चित्रा वाघ यांनी केली आहे. त्याचबरोबर त्या म्हणाल्या, ‘मला आश्चर्य वाटतंय आहे की, वाक्य पूर्ण न ऐकता त्यावरून वाद निर्माण केला जात आहे.
मोठी बातमी! नवणीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित
नेमकं काय म्हणाल्या होत्या चित्र वाघ?
घरोघरी सावित्री दिसतात, मात्र चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध सुरु आहे असं विधान चित्र वाघ यांनी केलं होत. त्या पुण्यामधील एका कार्यक्रमात बोलत होत्या त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.
चाहता असावा तर असा! अपंग व्यक्ती मित्राच्या पाठीवर बसून गेला ‘पठाण’ चित्रपट पहायला