आपल्या गजब फॅशनमुळे प्रसिद्धीस आलेली उर्फी जावेद (Urfi Jawed) व भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. उर्फीच्या कपडे न घालण्यावरून चित्रा वाघ यांनी तिच्यावर टीका केली होती. तसेच पत्रकार परिषद घेत ‘असला नंगानाच महाराष्ट्रात चालणार नाही’ असे सांगितले होते तसेच तिला अटक करण्यात यावी अशी पोलिसांकडे मागणी केली होती.
चाहता असावा तर असा! अपंग व्यक्ती मित्राच्या पाठीवर बसून गेला ‘पठाण’ चित्रपट पहायला
यानंतर त्या दोघींमध्ये ट्विटर (Twitter) युद्ध पण रंगले होते. दरम्यान या दोघींच्या वादावर पडदा पडल्याचे दिसून येत आहे. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी उर्फीचे जाहीर कौतुक देखील केले आहे. यावेळी त्या म्हणाल्या आहेत की, “माझा कुठल्या धर्माला विरोध नाही. माझा फक्त त्या विकृतीला विरोध आहे. मात्र आता उर्फीचे कौतुक केले पाहिजे. कारण, ती चांगल्या कपड्यांमध्ये दिसत आहे.”
मोठी बातमी! नवणीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित
उर्फीने काहीतरी ठरवले असेल. कारण आता ती चांगल्या कपड्यांमध्ये वावरत आहे. अनेकजण तिच्या या कपड्यांमधील फोटो पाठवत आहेत. कोण सुधारत असेल तर त्याचे कौतुक केले पाहिजे. मी फक्त इतकेच म्हणेन की, बाई कपडे घाल आणि फिर. असे देखील चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या आहेत.
पुण्यात दोन गटात राडा! कोयत्यांचा वापर करून केली तुफान मारामारी