
घरोघरी सावित्री दिसतात, मात्र चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध सुरु आहे असं विधान चित्रा वाघ यांनी केलं होत. त्या पुण्यामधील एका कार्यक्रमात बोलत होत्या. चित्रा वाघ यांच्या या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्याचबरोबर अनेक संघटनांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. यामध्येच आता ‘भीम आर्मी’ देखील आक्रमक झाली आहे.
अदानी ग्रुपसाठी धक्कदायक बातमी, गौतम अदानी टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर
चित्रा वाघ यांच्या विधानावर भीम आर्मीने आक्षेप घेतला आहे. आमच्या महिला ब्रिगेड चित्रा वाघ यांचे शाईने तोंड काळ केल्याशिवाय राहणार नाहीत, असा गंभीर इशारा देखील भीम आर्मीने दिला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ४ जण जागीच ठार
तूमचं डोकं फिरलंय का? चंद्रकांत पाटलांना महात्मा ज्योतिबा फुलेंची उपमा देवून तुम्ही महात्मा फुलेंचा अपमान केलाय. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुमच्या विधानाचा जाहीर तीव्र निषेध आहे. भीम आर्मी च्या महिला ब्रिगेड तुमच्यावर शाईफेक केल्याशिवाय राहणार नाहीत, असा गंभीर इशारा भीमा आर्मीचे अशोक कांबळे यांनी दिलाय.
मोठी बातमी! भारतीय सलामीवीर मुरली विजयनं जाहीर केली निवृत्ती