Bus Accident । इंदापूरमध्ये बसचा भीषण अपघात! एक शिक्षक ठार तर विद्यार्थी जखमी

Bus Accident

Bus Accident । शैक्षणिक सहली (Educational trips) दरवर्षी आयोजित केल्या जातात, या सहलींमध्ये विद्यार्थ्यांना अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. परंतु, सध्या अपघाताचे (Accident) प्रमाण खूप वाढले आहे. अनेकदा अपघातात काहीजण ठार होतात. सध्याही असाच एक भीषण अपघात झाला आहे. सहलीच्या बसची टेम्पोला धडक (Bus-Tempo Accident) बसून एक शिक्षक ठार तर विद्यार्थी जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

तुम्ही YouTube वरून अधिक पैसे कमवू शकाल, भारतीयांसाठी नवीन फिचर सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात (Indapur Bus Tempo Accident) झाला आहे. बसची टेम्पोला धडक बसली. ही धडक (School Picnic Bus Accident) इतकी जोरदार होती की यात एक शिक्षक जागीच ठार झाला आहे तर, एक शिक्षक जखमी झाला असून विद्यार्थीही जखमी झाले आहेत. अपघातातील या जखमींवर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Indapur Bus Accident)

LPG Price Reduced । आनंदाची बातमी! गॅस सिलिंडरचे दर कमी झाले; ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

एसटी बसने थांबलेल्या टेम्पोला धडक दिली. अकलूजच्या जवळ आल्यावर एका वळणावर बांबू घेऊन जाणारा टेम्पो पंक्चर झाला होता. त्यामुळे तो रस्त्याच्या बाजूला उभा होता. वेळ पहाटेची असल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोचा ड्रायव्हरला अंदाज आला नाही. त्यामुळे हा अपघात झाला. ही एसटी बस विद्यार्थ्यांना घेऊन कोकणात गेली होती.

Viral Video । प्री-वेडिंग फोटोशूटदरम्यान आला साप, घाबरून जोडप्याने केलं असं कृत्य की..व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

Spread the love