Christian Oliver Dies । हॉलिवूड सिनेसृष्टीतून सध्या एक दु:खद बातमी समोर आली आहे. जर्मन वंशाचा हॉलिवूड अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हरचा अमेरिकेत विमान अपघातात मृत्यू झाला. त्याच्या दोन मुलींनाही या अपघातात जीव गमवावा लागला. गुरुवारी नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करुन घरी परतत असताना त्यांचे विमान कॅरेबियन बेटाजवळील समुद्रामध्ये कोसळलं आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये विमान चालकाचा देखील मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. (Hollywood Actor Christian Oliver Plane Crash)
Sharad Mohol । शरद मोहोळ याचे भाजपशी कनेक्शन? धक्कादायक माहिती समोर
ख्रिश्चन ऑलिव्हर मोठ्या पडद्यावर जॉर्ज क्लूनीसोबत “द गुड जर्मन” आणि 2008 च्या अॅक्शन-कॉमेडी “स्पीड रेसर” मध्ये दिसला. रॉयल सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स पोलिस फोर्सने एका निवेदनात म्हटले आहे की तो प्रवास करत असलेले खाजगी आणि सिंगल-इंजिन विमान गुरुवारी क्रॅश झाले.
Sharad Mohal । मोठी बातमी! शरद मोहोळ हत्याप्रकरणाचं धक्कादायक कारण समोर; पोलीसही चक्रावले
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉलिवूड अभिनेत्याचे विमान समुद्रात पडताच मच्छीमार, आणि तटरक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर तेथून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातामध्ये ऑलिव्हरसह त्याच्या दोन मुलींचा देखील मृत्यू झाला आहे. ५१ वर्षीय ऑलिव्हर, त्याच्या मुली मॅडिटा (१० वर्षे) आणि ॲनिक (१२ वर्षे) आणि पायलट रॉबर्ट सॅक्स अशी मृतांची नावे आहेत.