Site icon e लोकहित | Marathi News

नागरिकांनो.. घरातून बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

Mumbai

महाराष्ट्रात यावर्षी पावसाने (Maharashtra rain update) उशिरा सुरुवात केली. परंतु जरी उशिरा सुरुवात केली असली तरी त्याने सर्व जिल्ह्यात जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हवामान खात्याने (IMD) काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे. तसेच कोकणात (Kokan) 3 जुलैपर्यंत पावसाचा इशारा दिला असून कोकणसह मुंबईमध्ये (Mumbai) येलो अलर्ट जारी केला आहे. (Latest Marathi Update)

Ashes Series 2023 | ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका, दुखापतीमुळे ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर

मुंबईत यावर्षी पावसाने (Mumbai rain update) उशिरा हजेरी लावली असली तरी या ठिकाणी मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी मुंबई शहर 32.00 मिमी, पूर्व उपनगर 69.00 मिमी तसेच पश्चिम उपनगर 62.00 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याशिवाय पुढील २४ तास मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. कारण यादरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात! 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; तर अनेकजण जखमी

दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची कोंडी होत आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा येत आहे. अशातच मुंबईमध्ये पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याने मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही – पंंकजा मुंडे

हे ही पहा

Spread the love
Exit mobile version