Rain Update | राज्यात बऱ्याच ठिकाणी तुफान पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी पावसानी अजूनही हजेरी लावलेली नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस झाला नाही तेथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. मागच्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई आणि नवी मुंबई परिसरामध्ये पाऊस पडला नव्हता मात्र आज सकाळपासून मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. (Rain Update )
Delhi Crime । महिलेच्या शरिराचे तुकडे करून फेकले पुलाजवळ, धक्कादायक घटनेने दिल्ली पुन्हा हादरली
मागच्या काही दिवस पाऊस पडला नव्हता मात्र काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाचा जोर वाढल्याचे दिसत आहे. आज सकाळपासूनच मुंबईकरांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. (Mumbai rain update)
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, विदर्भासह कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर राज्याच्या उर्वरित भागात आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची हजेरी असणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.