Weather forecast । पुणे : यंदाच्या वर्षी राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाने (Heavy Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे. जून महिना उलटला तरी पावसाने तोंड दाखवले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. परंतु मागील महिन्यात पावसाने थैमान (Heavy Rain) घातले. मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी पेरण्यांच्या कामांना वेग आला आहे. (Latest Marathi News)
Manipur Violence | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडका! हल्ल्यात आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा वेग मंदावला आहे. हवामान खात्याने पुण्यासह सातारा, चंद्रपूर, बुलढाणा वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट (IMD Alert) देण्यात आला आहे. कोकणामध्ये १० ऑगस्टपर्यंत पाऊस असणार आहे तर कोकण विभाग सोडला तर राज्यात ८ ऑगस्टपर्यंत पाऊस असेल. त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार आहे. (Heavy Rain in Pune)
परभणी जिल्ह्यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात खरीप पिकांच्या मशागतीला वेग आलेला आहे. सध्या येथे पावसाने विश्रांती घेतली असून आता शेतकरीवर्ग कोळपणी, फवारणीच्या कामात मग्न आहे. मुबलक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे पिके चांगली बहरलेली पाहायला मिळत आहे.
Cabinet Expansion । अखेर मुहूर्त मिळाला! पुढच्या आठवड्यात होणार मंत्रिमंडळाचा विस्तार?
परंतु, राज्याच्या अनेक भागात पावसाने अजूनही पाठ फिरवली आहे. पाऊस नसल्याने या भागातील पेरण्या झाल्याच नसल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. जर येत्या काही दिवसात या ठिकाणी पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
Amit Shah Pune Visit । अमित शहांचा आज पुणे दौरा, ‘हे’ रस्ते असतील बंद