Crime News । किरकोळ कारणावरून सतत पती-पत्नीमध्ये वाद होत असतात. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. काही वाद तर पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतात. (Crime) सध्या पुण्यातून कौटुंबिक वाद (Crime in Pune) वाढत असल्याचे समोर येत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. जेवणात त्रुटी काढल्याने पत्नीने पतीवर थेट चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. (Latest marathi news)
नमिता श्रवण माने असे वार करणाऱ्या महिलेच नाव आहे. श्रवण माने असं वार झालेल्या पतीच नाव असून ही पुण्यातील हडपसर परिसरातून घटना समोर आली आहे. पती रोज जेवणामध्ये त्रुटी काढतो त्यामुळे पत्नीला राग अनावर झाला. रागाच्या भरात पत्नीने पतीवर कांदा कापत असताना त्याच सुरीने वार केल्याची घटना घडली आहे.
Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा हुल्लडबाजांचा राडा, दगडफेकीमध्ये तरुण झाला जखमी
या विरोधात पत्नीविरोधात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 1 फेब्रुवारीला रात्री साडेबाराच्या दरम्यान पती घरी आल्यानंतर पत्नी जेवण बनवत होती हे पाहून नवऱ्याला राग आला. त्यामुळे जेवण तयार झालं नसल्याने त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर पती जेवण करत होता. त्यावेळी पतीने नेहमीप्रमाणे जेवणात चुका काढल्या, यावेळी पत्नीने कांदा कपणाऱ्या सूरीने पतीच्या हातावर वार केला.