
मुंबई : अजित पवार यांना शिखर बँक कथित घोटाळा (Shikhar Bank) प्रकरणी पुन्हा टार्गेट करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांची ईडी (ED) आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवार यांच्यासह 72 संचालकांची चौकशी होणार आहे. दरम्यान ईडीनं कोर्टात सादर केलेल्या अहवालात याचे पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोर्टाकडून याचिकाकर्त्यांना उत्तर सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यामुळे आता 18 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं याआधी
क्लोजर रिपोर्ट देऊन या प्रकरणाची चौकशी बंद केली होती. परंतु आता या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहेत.
‘या’ जिल्ह्यातील दोन तरुणांनी यूट्यूबवरुन घेतले शेतीचे ज्ञान, वर्षातच घेतायत लाखोंचे उत्पादन
नेमका काय आहे शिखर बँक घोटाळा?
2001 ते 2011 या काळात शिखर बँकेनं राज्यातील 23 सहकारी साखर कारखान्यांना काहीच तारण न देता कर्ज दिलं होत. दरम्यान आघाडी सरकारच्या काळात या कर्जवाटप प्रकरणी कर्जवसुली चुकवली, असा आरोप करण्यात आला होता. इतकंच नाही तर अजित पवार यांचे जवळचे मानले जाणारे माणिकराव पाटील हे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना ही कर्ज देण्यात आले असल्याचादेखील आरोप करण्यात आला होता. हा शिखर बँक घोटाळा तब्बल 2 हजार 61 कोटी रुपयांचा होता. तसेच या घोटाळ्यात सरकारी तिजोरीला 25 हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. या शिखर बँकेकडून नेत्यांनी स्वतःच्या संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत फायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला.
सर्वांच्या एकीची ताकद बिबी गावामधे मध्ये पाहायला मिळाली
खरंतर आर्थिक गुन्हे शाखेनं शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद केला आला होता. तसेच या प्रकरणाबाबत सी-समरी अहवाल दाखल करुन हे प्रकरण बंद करावं, अशी विनंतीदेखील करण्यात आली होती. इतकंच नाही तर या प्रकरणी केलेल्या तपासाअंती कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याचं कृत्य आढळलं नाही, असा अहवालदेखील देण्यात आला होता. दरम्यान आता दोन वर्षांपूर्वी बंद केलेली ही शिखर बँक घोटाळ्याची फाईल उघडली जाणार असून आता पुन्हा एकदा अजित पवारांसह अनेकांची चौकशी होणार असल्याची दाट शक्यता आहे.