मागील काही दिवसांपासून हिमाचल प्रदेश आणि पंजाब (Himachal Pradesh and Punjab) या दोन्ही राज्यात पावसाने थैमान घातले आहे. ढगफुटी झाल्याने या भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. जनजीवन विस्कळीत झाल्याने अनेकांनी स्थलांतर केले आहे. ठिकठिकाणी भूस्खलन झाल्याने रस्ते बंद आहेत. हिमाचल प्रदेशात झालेल्या पावसाने (Rain in Himachal Pradesh) आतापर्यंत 80 जणांचा बळी घेतला आहे. तर पंजाबमध्ये पावसाने आतापर्यंत 10 जणांचा बळी घेतला आहे. (Latest Marathi News)
तसेच हिमाचल प्रदेशामध्ये पावसाने 470 जनावरांचा मृत्यू झाला असून 100 घरे जमीनदोस्त झाली आहेत. 350 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. पावसामुळे (Heavy Rain in Himachal Pradesh) दहा जण बेपत्ता झाले असून त्यांचा अजूनही शोध लागला नाही. पावसामुळे हिमाचल प्रदेशमधील 900 जण तर चंद्रतालमध्ये 350 जण अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्याचे काम सध्या सुरु आहे.
अपघाताचे सत्र थांबेना! नाशिकमध्ये भाविकांची बस कोसळली दरीत, समृद्धी महामार्गावरही आणखी भीषण अपघात
पंजाबमध्येही (Rain in Punjab) भयानक स्थिती आहे. मागील तीन दिवसांपासून जोरदार पडत असलेल्या जोरदार पावसामुळे चंदीगडमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थलांतर केले आहे. दरम्यान, चंदीगडमध्ये मागील 23 वर्षातील सर्वात जास्त पडला आहे. पावसामुळे या दोन्ही राज्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अशातच आता हवामान खात्याकडून (IMD) शिमला, सिरमौर आणि किनौर आदी जिल्ह्यात मध्यम ते प्रचंड पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिरमौर, शिमला, मंडी आणि किन्नौरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
Monsoon Update । राज्यात पावसाचे थैमान! अंगावर झाड पडल्याने आतापर्यंत ४ जणांचा बळी