Site icon e लोकहित | Marathi News

CM Eknath Shinde Resign । ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; राजकीय घडामोडींना वेग

Eknath Shinde

CM Eknath Shinde Resign । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन दोन दिवस झाले असले तरी, राज्यात नव्या सरकार स्थापनेसाठी अद्याप निश्चितता आलेली नाही. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर, सत्तास्थापनेच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. दरम्यान, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी 11.15 वाजता राजभवनात दाखल होऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सादर केला आहे.

Politics News । ब्रेकिंग! महारष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? सर्वात मोठी अपडेट समोर

यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील राजभवनात उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देताना महायुतीच्या सरकार स्थापनेसाठी अद्याप राज्यपालांकडे कोणताही औपचारिक दावा केला नाही. शिंदे यांनी, राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर, “जोपर्यंत नवीन सरकार येत नाही, तोपर्यंत कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून मीच राज्याचे कारभार सांभाळत राहील,” असे स्पष्ट केले.

Ladki Bahin Yojna । महायुतीसरकार लाडक्या बहिणींना देणार 2,100 रुपये; डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

यादरम्यान, महायुतीतील वाद अजूनही कायम आहे. भाजपचे अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आग्रह धरत आहेत, तर एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. अजित पवार गटानेही मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेची प्रक्रिया अधिकाधिक जटिल बनत असून, आगामी दिवसांत महायुतीतून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Accident News । धक्कादायक, लग्नावरून परतताना बोलेरो कारचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार

Spread the love
Exit mobile version