मुंबई : नैसर्गिक वायूचा वापर वीज, खते आणि वाहनांसाठी सीएनजी करण्यासाठी केला जातो. दरम्यान देशात तयार होणाऱ्या गॅसची किंमत सरकार ठरवते. आता या आठवड्यात नैसर्गिक वायूच्या किमती सर्वकालीन उच्चांकावर पोहोचू शकतात. सरकारला 1 ऑक्टोबर रोजी गॅसच्या दरात पुढील सुधारणा करायची आहे. सरकारी मालकीच्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC) जुन्या फील्डमधून उत्पादित केलेल्या गॅससाठी दिलेला दर 6.1 डॉलर प्रति इकाई वरून 9 डॉलर प्रति युनिटपर्यंत वाढू शकतो. महत्वाचं म्हणजे नियमन केलेल्या क्षेत्रांसाठी हा आतापर्यंतचा सर्वोच्च दर असणार आहे.
दसऱ्यापूर्वीच झेंडूचा भाव 70 रुपये किलोपर्यंत; आणखी भाव वाढण्याची शक्यता
बेंचमार्क आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे एप्रिल 2019 पासून नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली ही तिसरी वाढ असणार आहे. सरकार दर सहा महिन्यांनी गॅसची किंमत ठरवते. ही किंमत अमेरिका, कॅनडा आणि रशिया यांसारख्या गॅसचा साठा असलेल्या देशांच्या गेल्या एक वर्षाच्या दरांच्या आधारे त्रैमासिक अंतराने निश्चित केली जाते. त्यामुळे आता 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 2023 या कालावधीतील गॅसची किंमत जुलै 2021 ते जून 2022 पर्यंतच्या किमतीच्या आधारे निश्चित केली जाईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किमतीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली होती.
आता लसणाच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता; वाचा आजचे दर
पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार, नियोजन आयोगाचे माजी सदस्य किरीट एस पारेख यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अंतिम ग्राहकांसाठी गॅसची वाजवी किंमत सुचवण्यास सांगण्यात आले आहे. या समितीला महिन्याच्या अखेरीस अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या समितीमध्ये खाजगी गॅस ऑपरेटरचा एक प्रतिनिधी आणि सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपनी गेल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) आणि खत मंत्रालयाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी देखील समाविष्ट आहे.