कपल लोक काही क्षण सोबत घालविण्यासाठी लॉजवर रूम बुक करून एकांतात वेळ घालवतात. मात्र सध्या बऱ्याच ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जातो. या व्यवसायामध्ये हॉटेल चालक कॉलेजच्या मुली, अल्पवयीन मुली, त्याचबरोबर महिलांचा देखील समावेश करतात. सध्या लॉजिंगच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. सध्या देखील असाच एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई लोकलमध्ये जोड्याने सर्वांसमोर केलं किस अन् व्हिडीओ झाला व्हायरल; पाहा Video
पारशिवनीजवळील नायकुंड परिसरात एका फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. माहितीनुसार, पारशिवनीजवळील नायकुंड परिसरात एका फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉजिंगमध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याची भनक पोलिसांना लागली यावेळी पोलिसांना माहिती मिळताच त्या लॉजवर धाड टाकण्यात आली.
सावधान! चिकन खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा
यावेळी पोलिसांनी एका कॉलेजच्या तरुणीला हॉटेलच्या खोलीतून ताब्यात घेतले. त्याचबरोबर वेश्या व्यवसाय करणाऱ्या रेस्टॉरंट मॅनेजर आणि त्याच्या सहाय्यकाला पोलिसांनी अटक केली केल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत वाढली
माहितीनुसार, पाच मुली वेश्या व्यवसायासाठी तयार होत्या. या मुली महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या. त्यावेळी त्यांना पैशाची अडचण असल्याने त्या वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये आलेल्या एका ग्राहकाकडून आरोपी ४ ते ५ हजार रुपये घ्यायचा आणि त्या मुलींना पाचशे रुपये देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणामध्ये सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करत आहे.
सर्वात मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका, 2 वर्षासाठी वकीलीची सनद रद्द