सोशल मीडियावर (Social Media) अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. माणसांचे, पाळीव प्राण्यांचे, जंगली प्राण्यांचे, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या माकडाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये माकड (Monkey) चक्क पतंग उडवताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसतंय की, माकड छताच्या काठावर बसलेलं आहे. माकड पतंगाची दोरी ओढताना दिसत आहे. त्याचबरोबर तिथे बसलेली मुलं जोरजोरात ओरडत एन्जॉय करताना दिसत आहेत.
अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट!
हा व्हिडीओ sad_status_songs_ या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ते खरंच माकड आहे का?, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी या व्हिडिओवर देत आहेत.