
मुंबई : सुप्रसिद्ध कॉमेडियन कलाकार राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रीवास्तव यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजू श्रीवास्तव यांची तब्येत बिघडल्याचे माहिती कळताच त्यांच्या चाहत्यांनी नैराश्य व्यक्त केले आहे.
राजू श्रीवास्तव जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्यांच्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्या. व्यायाम करत असतानाच राजू श्रीवास्तव जमिनीवर कोसळले. त्यानंतर ताबोडतोब त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याबाबत राजू यांचे पीआरओ अजित यांनी माहिती दिली.
राजू यांचे पीआरओ अजित यांनी सांगितलं की, “राजू आपल्या राजकीय पक्षातील काही बड्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्ली येथे थांबले होते. सकाळी ते व्यायाम करण्यासाठी जिममध्ये गेले. व्यायाम करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.” त्यांच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा झाली आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली.