मुंबई : देशात सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.दरम्यान अशातच आरोग्य मंत्रालयाने आज 28ऑगस्ट रोजी रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी
या आकडेवारीनुसार देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 86,591 वर पोहोचली आहे.तर गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,436 नवीन रुग्ण आढळले असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे त्यामुळे ही सर्वांसाठी दिलासादायक बाब आहे.महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 4,37,93,787 लोक बरे झाले आहेत.
PM Modi: पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून चाळीसगावमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाची आकडेवारी
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाच्या 1723 नव्या रुग्णांची भर पडली आहे.तर शनिवारी दिवसभरात एकूण 1845 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.दरम्यान शनिवारी दिवसभरात एकूण 1845 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.तसेच राज्यात एकूण 11743 सक्रिय रुग्ण संख्या आहे.राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,34, 878 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे.
Rahul Gandhi: काँग्रेसला धक्का! राहुल गांधींच्या नेतृत्वावर टीका करत ‘या’ नेत्याने दिला राजीनामा
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एकूण संसर्गापैकी सक्रिय प्रकरणे 0.22 टक्के आहेत, तर पुनर्प्राप्तीचा दर 98.59 टक्के आहे. दररोज संसर्ग दर 4.15 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 3.59 टक्के नोंदवला गेला.