Cotton Farming । संपूर्ण राज्यासह देशभरात कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन (Cotton production) घेतले जाते. कापूस हे एक मुख्य नगदी पीक असून मागील काही वर्षांपासून कापसाला चांगला समाधानकारक दर (Cotton Rate) मिळत आहे. त्यामुळे कापूस (Cotton) उत्पादक शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. या पिकाचे विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. (Latest Marathi News)
Social Security । कोट्यवधी ग्राहकांसाठी SBI ने आणली नवीन सेवा, होणार मोठा फायदा
तीन कारणांमुळे वाढतील कापसाचे दर
परंतु यावर्षी मात्र कापसाला दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी तो घरात साठवून ठेवला आहे. समजा त्यांना यावर्षी चांगला दर मिळाला नाही तर त्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. अशातच कापसाला मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होत आहे. साहजिकच खर्चात वाढ होत चालली आहे. (Cotton Price)
Dream Girl 2 । ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
असे असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारी कापूस उत्पादनाची स्थिती आणि जागतिक स्तरावरील मागणीमुळे कापसाला यावर्षी चांगला भाव मिळण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. काही कारणांमुळेही कापसाचे दर वाढतील. दरम्यान चीनमधील कापसाचे उत्पादन यंदा 12 टक्क्यांनी कमी राहू शकते. तसेच त्यांना यंदा जास्त कापसाची गरज पडणार आहे.
अमेरिकेचे कापूस उत्पादन कमी होऊ शकते. ब्राझीलमध्ये पाच टक्के आणि भारतात दोन टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी होईल असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला आहे. यावर्षी जरी भारताचा 122 लाख हेक्टर कापसाची लागवड झाली असली तरी पावसाने ओढ दिल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कापसाला चांगला बाजारभाव मिळू शकतो.
Rain Update । शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी! ‘या’ दिवशी होणार पावसाचे आगमन