दिलासादायक! अखेर पीएम किसान योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार

Comforting! Finally, the installment of PM Kisan Yojana will be deposited in the account on 'this' day

मुंबई : आपण पाहतो केंद्र सरकार राज्य सरकार जनतेसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. दरम्यान केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठीएक विशेष योजना राबवली गेली आहे. ती म्हणजे पीएम किसान (pm kisan) योजना. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 3 हप्त्यामध्ये 6 हजार रुपये दिले जातात.दरम्यान सरकारने याऱ्योजनेसाठी ई-केवायसीची (E-KYC) अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत निश्चित केली होती.

शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी; शेततळे बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान

परंतु अनेक लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण झालेली नाही. महत्वाची बाब म्हणजे जेव्हापासून केंद्र सरकारने (central government) या योजनेसाठी ई-केवायसी आवश्यक केली, तेव्हापासून या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सातत्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा नवा डाव; शिवाजी पार्क येथेच दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू

दरम्यान प्रधान सचिव डॉ. अरुण कुमार मेहता यांनी सांगितले की, पीएम किसान योजनेच्या दिलेल्या माहितीनुसार 12 वा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक केलेल्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल. तसेच 5 सप्टेंबरपर्यंत रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर (transfer) होण्याची शक्यता आहे अस देखील प्रधान सचिव डॉ. अरुण कुमार मेहता यांनी सांगितले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, सरकारचे यावेळी मुख्य लक्ष म्हंजे अपात्र लाभार्थ्यांचा लाभ थांबवणे आणि पैसे वसूल करणे आहे.आणि जे शेतकरी पात्र आहेत. त्या शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण झाल्याशिवाय हप्ता दिला जाणार नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *