काल मंत्रीमंडळाची बैठक (Cabinet meeting) झाली. दरम्यान या बैठकीत शेतकऱ्यांच्या (farmers) हिताचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्यातील भूविकास बँकेच्या सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांचे तब्बल 964.15 कोटींचे थकीत कर्ज (Overdue debt) माफ करण्यात आले आहे. तसेच या बँकेच्या सर्व मालमत्ता शासनाच्या ताब्यात घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ६९,००० हेक्टर शेतजमिनीवरील भूविकास बँकांच्या कर्जाचा बोजा कमी होणार आहे.
आता मका पिकातील तण होणार नष्ट, ‘हे’ आहे नवीन तणनाशक जे ठरतंय रामबाण उपाय
इतकंच नाही तर राज्यातील भूविकास बँकेच्या सर्व शाखांमधील सेवानिवृत्त तसेच कार्यरत व कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकूण रु.275.40 कोटींची थकबाकी लवकरच देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे भूविकास बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महत्वाची बाब म्हणजे कर्मचार्यांची ही थकीत रक्कम शासनामार्फत सहकार आयुक्त आणि निबंधक यांना उपलब्ध करून दिली जाईल.
Sanjay Datt: “मी आता साउथचे सिनेमे जास्त करणार”, संजय दत्तचं मोठं विधान, कारण आल समोर…
दरम्यान गेल्या काही वर्षांपासून केवळ कागदोपत्री असलेल्या या बँकेच्या मालमत्तेची विल्हेवाट सरकार लावणार आहे. ही विल्हेवाट लावण्यासाठी सरकारने अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट उपसमिती स्थापन केली. दरम्यान या समितीच्या अहवालानुसार आता शेतकऱ्यांनी कर्जमाफीमुळे कर्जासाठी गहाण ठेवलेली जमीन मोकळी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.