मागील काही दिवसांपूर्वी राज्यात अतिवृष्टी झाली. दरम्यान या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या (farmers) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाच्या (state government) माध्यमातून शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी आर्थिक (Financial) मदत करण्यात येणार आहे. दरम्यान यासाठी तब्बल 3 लाख 501 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात मंजुरी देण्यात आलीय. परंतु यासाठी एक गोष्ट करणे आवश्यक आहे ती म्हणजे आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्यांनी (Lifestyle) ई-पीक पाहणी (E-Peak Inspection) प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
काय सांगता? ‘या’ गावात चक्क माकडांच्या नावावर आहे 32 एकर जमीन
जर ही ई-पीक पाहणी केली नाही तर शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ घेता येणार नाही. यासाठीच आता राज्य शासनाने ई-पीक पाहणी प्रक्रियेची मुदत वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना 22 सप्टेंबर 2022 पर्यंत ही ई-पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडून अतिवृष्टी भरपाईचा लाभ मिळावा यासाठी त्वरित ई-पीक पाहणी प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
‘या’ जिल्ह्यातील दोन तरुणांनी यूट्यूबवरुन घेतले शेतीचे ज्ञान, वर्षातच घेतायत लाखोंचे उत्पादन
शेतकऱ्यांना किती मिळणार मदत?
1) शेतकऱ्यांना निकषानुसार जिरायत शेतीतील पिकाच्या (Agriculture in Maharashtra) नुकसानीसाठी 13 हजार 500 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत.
2) बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत.
3 )तर बहुवार्षिक पिकाच्या मदतीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वितरीत केले जाणार आहे.