शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ई-पीक पाहणीची अट झाली रद्द, आता थेट मिळणार शेतकऱ्यांना मदत

Comforting for farmers! The condition of e-pick inspection has been canceled, now the farmers will get direct help

मागील काही दिवसांपासून राज्यात (Maharashtra) अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे (return rains) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांच्या (crops) झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान अशातच आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक घोषणा केली आहे. राज्य सरकारने आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यासाठी (Lifestyle) ई-पीक पाहणी प्रक्रिया अनिवार्य केली होती. दरम्यान त्यानुसारच नुकसानभरपाई (Compensation) मिळणार होती. परंतु आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी ही ई-पीक पाहणी तात्पुरती रद्द केली आहे. त्यामुळे आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Sugar Cane: शॉर्टसर्किटमुळे इंदापूर तालुक्यातील तीन एकर उस जळून खाक

खरतर अतिवृष्टीमुळे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन दिवस शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. दरम्यान यावेळी विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून ई-पीक पहणीची अट रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आता या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक यांना स्वतः जाऊन पिकांचे पंचनामे करावे लागणार आहेत.

आता ‘या’ तालुक्यातही ऊस वाहतूक रोखली; स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक

इतकंच नाही तर पिकाची नुकसान झालेला कोणताच शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही अशी सरकारची भूमिका असणार आहे अस विखे पाटील यांनी सांगितले आहे. महत्वाची बाब म्हणजे यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती (Agriculture) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे राज्य सरकारकडून एनडीआरएफच्या दुप्पटीने आर्थिक (Financial) मदत जाहीर करण्यात आली. म्हणून सर्व शेतकऱ्याच्या हातात मदत कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

ऑनस्क्रीन डिंपल कपाडिया यांना Kiss करत होते विनोद खन्ना, पुढे असं घडली की…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *