सर्वसामान्यांसाठी आता एक दिलासदायक बातमी समोर आली आहे. खाद्यतेल (edible oil) बाजारात मोठी घसरण झाली आहे. खाद्यतेलाचे भाव उतरल्यामुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये तिळाचेतेल, पामतेल, पामोलीन तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर सोयाबीन (soybeans), सूर्यफूल (Sunflower) यांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.
रोहित पवारांचा विरोधकांना दिला इशारा; म्हणाले,”…कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही”
माहितीनुसार, डॉलरच्या (dollar) तुलनेत सध्या रुपया मजबूत स्थितीमध्ये आहे. त्यामुळे परिणामी, पाम, पामोलीन सारख्या आयात तेलांचे दर कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यातच हे दर कमी झाले आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अरे बापरे! चक्क बस स्थानकातून एसटी बस गेली चोरीला; वाचा सविस्तर
मागच्या आठवड्याच्या शेवटी हा बदल दिसून आला. सीपीओ आणि पामोलिन (CPO and Palmolin) तेलाच्या किमतीत घट नोंदविण्यात आली आहे. त्याचबरोबर तेलबिया वर्गीय पिकांच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यांच्या निर्यातीच्या धोरणाचा देखील परिणाम झाला. सध्या बाजारामध्ये सोयाबीन, तिळ आणि सूर्यफूलाचा तुटवडा निर्माण झाला आहे.