मुंबई : गेल्या काही दिवसांपासून लंपी रोगाने (Lumpy disease) राज्यासह देशात थैमान घातले आहे. दरम्यान या रोगामुळे अनेक जनावरांना (animals) आपला जीव गमवावा लागलाय. जनावरांच्या मृत्युमुळे (dies) अनेक शेतकऱ्यांना (farmers) फटका बसत आहे. पण आता पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता राज्य सरकारने याबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
आता लम्पी त्वचा रोगाने संक्रमित गुरांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महाराष्ट्राचा पशुसंवर्धन विभाग करेल. त्याचबरोबर राज्य सरकार या आजाराबद्दल सतर्क झालेलं असून,सरकारने लम्पी स्किन डिसीजची लागण झालेल्या गुरांना योग्य उपचार देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ड्रग्ज बँक (Drugs Bank) स्थापन करण्याची देखील घोषणा केली आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम लढा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हता; अनिल पहाडे यांचे प्रतिपादन
लम्पी आजाराची लागण झालेल्या पशुधनावर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग बँक’ सर्वच जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दिली आहे. ही माहिती त्यांनी शुक्रवारी दिली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने लम्पी आजाराशी लढण्यासाठी राज्यस्तरीय 12 सदस्यीय टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतलाय.