कांदा उत्पादकांच्या कांद्याला (Onion) मागील काही दिवसांपूर्वी पाहिजे असा बाजारभाव मिळाला नाही. बाजारभाव म्हणजे अनेक ठिकाणी तर कांदा (Onion Rate) एक रुपया किलोने विकला गेला. इतकंच नाही कर काही शेतकऱ्यांना (Farmers) हमाली आणि इतर खर्च धरून बिलाचा एक रुपयाही मिळाला नाही. परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
संजय राऊतांच्या अडचणीत पुन्हा वाढ, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला तब्बल ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. यामुळे कांदा उत्पादकर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज अहमदनगर मध्ये कांद्याची आवक वाढली असून देखील कांद्याच्या बाजारभावात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
गोवरबद्दल केंद्रीय आरोग्य विभागाने दिली ‘ही’ महत्वाची माहिती; वाचा सविस्तर
यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील कामठी येथील निलेश बाळासाहेब चेमटे या युवा शेतकऱ्याच्या कांद्याला ३००० प्रति क्विंटल दर मिळाला आहे. कांद्याचे दर वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “मलाच महाराष्ट्राचं राज्यपाल पद नकोय”