स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी मोठे कष्ट घेत असतात. यासाठी खूप अनुभवी व हुशार असणाऱ्या शिक्षकांकडे ते क्लास देखील लावतात. दिल्ली,पुणे, मुंबई यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये तर स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेणाऱ्या क्लासेसचे जाळे पसरले आहे. या क्लासेसचे शिक्षक देखील प्रचंड अनुभवी व वयस्कर असतात. परंतु, उत्तर प्रदेश मधील अवघ्या 11 वर्षे वयाचा मुलगा upsc ची तयारी करणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करतो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटले ना?
‘या’ डेअरीमुळे महाराष्ट्रातील दुधाला सर्वाधिक दर
आपल्या वयाच्या दुप्पट वय असणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करणे म्हणजे विनोद वाटू शकतो. पण उत्तरप्रदेश मध्ये हा विनोद नाही तर वास्तव आहे. येथील यशवर्धन सिंग नावाचा मुलगा चक्क upsc ची तयारी करणाऱ्या मुलांचे क्लासेस घेतो. यशवर्धन याचे वय 11 वर्षे असून तो सध्या सातवीच्या वर्गात शिकतो. कानपूर येथे यशवर्धनचे स्वतःचे UPSC चे क्लासेस आहेत.
बारामतीमध्ये खोडवा ऊस उत्पादन व पाचट व्यवस्थापन कार्यक्रम; शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाकडून मार्गदर्शन
खरंतर यशवर्धन याचा IQ लेव्हल इतर सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे. 129 एवढा IQ असल्याने त्याची बुद्धिमत्ता असामान्य आहे. त्याची बुद्धीमत्ता पाहून उत्तरप्रदेश बोर्डाने त्याला चक्क सातव्या वर्गातून नवव्या वर्गात बसण्याची परवानगी दिली आहे. या मुलाच्या बुद्धिमत्तेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील प्रभावित झाले असून त्यांनी या मुलाचे कौतुक केले आहे. सप्टेंबर मध्ये यशवर्धनला योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. इतकेच नाही तर लंडनच्या हार्वर्ड रेकॉर्ड्स इन्स्टिट्यूटने यशवर्धनला यंगेस्ट हिस्टोरियन अवॉर्डने सन्मानित केले आहे.
आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार