बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट यामध्ये नेहमी तुलना होत असते. अनेक अभिनेत्यांना याबाबत प्रश्न विचारले जातात. दरम्यान एका प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत होणाऱ्या तुलनेबद्दल भाष्य केले आहे. यामध्ये त्याने आपण सर्वच भारताचे लोक आहोत. त्यामुळे चित्रपटांमध्ये तुलना केली जाऊ नये. असे सांगितले आहे.
महत्वाची बातमी! कृषी ड्रोनसाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार लाखोंचे अनुदान
केजीएफ ( KGF) या बहुचर्चित चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणाऱ्या ‘केजीएफ’ स्टार यश म्हणजेच नवीन कुमार गौडा ( Navin Kumar Gauda) याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत होणाऱ्या तुलनेबद्दल भाष्य केलंय. आपण सर्व भारताचे लोक आहोत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळे एक आहोत, त्यामुळे चित्रपटांमध्ये असा भेदभाव आणि तुलना केली जाऊ नये. असे तो म्हणाला आहे.
आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
यासोबतच त्याने कर्नाटकमधील लोकांना व त्याच्या चाहत्यांना बॉलिवूडचा आदर करण्याचे विनंती केली आहे. तसेच चित्रपट उद्योगाशी निगडित अभिनेते किंवा दिग्दर्शक या नात्याने दर्जेदार चित्रपट तयार होणे हे सर्वांच्या फायद्याचे असणार आहे. असे म्हणत यशने चित्रपट सृष्टीच्या भविष्यासाठी आपापसांत स्पर्धा करणे योग्य नाही असा संदेश लोकांना दिला आहे.