Ranbir Kapoor । मोठी बातमी! अभिनेता रणबीर कपूरविरुद्ध तक्रार दाखल, नेमकं कारण काय?

Ranbir Kapoor

Ranbir Kapoor । अभिनेता रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल (Animal) या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. चित्रपटाने जवान, पठाण या चित्रपटाचे विक्रम मोडले आहेत. बॉक्स ऑफिसवर कमाई (Animal box office collection) करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत अ‍ॅनिमलने स्थान मिळवले आहे. सध्या रणबीर कपूर चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. अशातच आता रणबीर कपूरविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । पुन्हा दादा विरुद्ध दादा संघर्ष? कार्यकर्त्यांना दिला चंद्रकांत पाटलांनी न्यायालयात जाण्याचा सल्ला

रणबीर कपूरच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचा (Christmas celebration) एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये तो ‘जय माता दी’चा जयघोष करत केकवर दारू ओतून त्याला आग लावतो. (Ranbir Kapoor Viral Video) परंतु नेटकऱ्यांना त्याची ही कृती अजिबात आवडली नाही. सोशल मीडियावर (Social media) त्याला खूप ट्रोल केले जात आहे. रणबीरने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे.

बुधवारी मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात रणबीरविरोधात तक्रार दाखल केली असल्याची माहिती आहे. परंतु या प्रकरणी अजून कोणती प्रथम माहिती अहवाल दाखल केला नाही. तक्रारीत असे म्हटले आहे की, हिंदू धर्मात इतर देवतांचे आर्जव करण्यापूर्वी अग्निदेवतेचे आवाहन केले जाते. रणबीर कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जाणूनबुजून अमली पदार्थाचा वापर करत धार्मिक भावना दुखावल्या.

Pune Koyata Gang । धक्कादायक! पुण्यात कोयता गँगची दहशत थांबेना, पोलिसांसमोरच केला हल्ला

Spread the love