Praniti Shinde । महाविकास आघाडीकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण लोकसभा निवडणुकीपूर्वीच प्रणिती शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाली आहे. (Ram Satpute vs Praniti Shinde)
वैभव बिराजदार यांनी प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ ऑटो रिक्षांसह शहरात विविध ठिकाणी विनापरवाना डिजिटल लावून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार आचारसंहिता कक्षप्रमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यावर आता तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. (Latest marathi news)
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली असली तरीही शहरातील ऑटो रिक्षांवर (क्र. एम एच १३ बी व्ही १६२८, एमएच १३ जी ९६८०) विनापरवाना दोन बाय दोन फूट आकाराचे डिजिटल लावून प्रचार केला जातोय. त्यांच्याविरुद्ध आता गुन्हा दाखल करावा, असे बिराजदार यांनी तक्रारीत म्हटले आहे.