मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाममुळे नागपूरची सर्वत्र चर्चा होती. मात्र आता वेगळ्याच राजकीय कारणाने नागपूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कटआऊट्स वरून ही चर्चा रंगली आहे.
80 वर्षाची आजी करोडपती; “बाजारात जाता जाता लॉटरीचे तिकीट घेतले आणि…”
त्याच झालंय अस की, नागपूर येथे एकाच ठिकणी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे कटआऊट्स लावण्यात आले आहेत. मात्र गंमत अशी झालीय की, यामध्ये एकनाथ शिंदे यांचे कटआऊत छोटे तर फडणवीस यांचे कटआऊट मोठे दिसत आहे.
सत्तेत असणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. फडणवीस शिंदेंना बाजूला सारणार अशा चर्चा सुरू असतानाच, ही घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात विविध चर्चा व अफवांना उधाण आले आहे.
उर्फी जावेदचा अनोखा फॅशन सेन्स; नाश्त्याच्या प्लेटने झाकले शरीर
12 डिसेंबरला नागपूर येथे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व किरण पांडव यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचे कटआऊट लावण्यात आले होते. त्यानंतर पुढील सहा दिवस हे एकच कटआऊट तेथे होते. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांच भल मोठं कटआऊट लावलेले दिसून येत आहे.
रानजनावरांची भीती, रात्रीची वीज, बळीराजाची परिस्थिती आहे तशीच!
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कटआऊट कोणी लावले आहे याबद्दल कोणालाच माहिती नाही. मात्र शिंदेपेक्षा फडणवीस यांचे मोठ्या आकाराचे कटआऊट पाहून राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.