Satara Loksabha । अजितदादांची नवी खेळी! ‘त्या’ जागेच्या बदल्यात मागितलेल्या जागेमुळे वाढली शिंदे-फडणवीसांची डोकेदुखी

Satara Loksabha

Satara Loksabha । सातारा लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahayuti vs Mahavikas Aghadi) कोण उमेदवार असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अजित पवार गटाने उदयनराजेंसाठी (Udayanraje Bhosale) साताऱ्याची जागा सोडली आहे. पण त्या जागेच्या बदल्यात मागितलेल्या जागेमुळे शिंदे-फडणवीसांची डोकेदुखी वाढली आहे. (Latest maarthi news)

Topers Ad

Dharashiv News । धाराशिवमध्ये तुंबळ हाणामारी! पाच जखमी तर 125 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

“जर आमच्या हक्काची साताऱ्याची जागा तुम्हाला हवी असेल तर आम्हाला नाशिकची जागा द्या”, अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे,अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे हे मागील दोन टर्मपासून खासदार असून या मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे या जागेवर भाजपकडून दावा केला आहे.

Satara Loksabha । उदयनराजेंविरोधात बिचुकले लोकसभेच्या मैदानात! साताऱ्यात होणार कांटे की टक्कर

नाशिक मतदारसंघात अगोदरच शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीनेदेखील आता या जागेची मागणी केल्याने महायुतीतील संघर्ष वाढू शकतो. याच पार्श्वभूमीवर कालच नाशिकमधील भाजपचे तीन आमदार आणि इतर काही पदाधिकारी भाजप नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचले होते. नाशिक मतदारसंघाच्या जागेबाबत तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागेल.

Crime News । छ. संभाजीनगर हादरलं! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आईला पाठवला धक्कादायक व्हिडीओ

Spread the love