Talathi Bharti । यावर्षी तलाठी पदाच्या 4344 जागांच्या भरतीसाठी (Talathi Bharti 2023) एकूण 13 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेत. विशेष म्हणजे यापूर्वी तलाठी भरतीची परीक्षा (Talathi Recruitment Exam) फक्त एकाच दिवशी होणार होती परंतु आता ही परीक्षा 19 दिवस चालणार आहे. TCS च्या वतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. (Latest Marathi News)
Viral Video । धबधब्याखाली आंघोळ करणे बेतले जीवावर, अंगावर पडला ढिगारा; पहा धक्कादायक व्हिडिओ
अशातच आज सकाळी 9 वाजता नागपूर येथील एमआयडीसी परिसरातील उमेदवार परीक्षा केंद्रावर गेले असता सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे असाच प्रकार अमरावतीमध्येही घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. तसेच पुण्यातील उमेदवारांचा औरंगाबादमध्ये आणि औरंगाबादच्या उमेदवारांना नागपूर, अमरावतीत परीक्षा केंद्र दिली आहेत. (Talathi Bharti Exam 2023)
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तलाठी भरती परीक्षा गैरप्रकारप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक केलेला गणेश घुशिंगे म्हाडा भरती परीक्षा गैरप्रकारातही संशयित आरोपी आहे. तो म्हाडा परीक्षेच्या निवड यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आला होता. दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे.
Weather Update । पुन्हा पावसाचे थैमान! हवामान खात्याने दिला अतिवृष्टीचा इशारा