Maharashtra politics । महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर असताना अजूनही काही जागांवर महायुतीचा तोडगा निघाला नाही. अशातच यंदाच्या निवडणुकीत कोणाचा विजय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण राज्यातले दोन मोठ्या पक्षात फूट पडली आहे. असे असूनही या पक्षांतर्गत धुसफूस सुरूच आहे. (Loksabha election 2024)
Car Accident News । भीषण अपघात, भरधाव वेगात स्कॉर्पिओ खांबाला धडकली, 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू
नुकतीच धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मंत्री अनिल पाटील यांनी देखील हजेरी लावली होती. पण या बैठकीतच अनिल पाटील (Anil Patil) यांच्यासमोरच कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कोणत्याही कार्यक्रमाबाबत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या धुळे शहराध्यक्षांना दिली जात नाही, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी अनिल पाटील यांच्याकडे केली. (Latest Marathi News)
Navneet Rana । नवनीत राणांच्या अडचणी वाढल्या! महायुतीतल्या ‘या’ तिसऱ्या बड्या नेत्याने थोपटले दंड
यावेळी कार्यकर्त्यांनी खूप गोंधळ घातला. यावर आता अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “धुळ्यात कोणतेही मतभेद नाहीत. जरी काही मतभेद असतील तर त्यावर तातडीने तोडगा काढून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करू. नाशिकच्या जागेवरून मतभेद सुरू आहेत. पण मेरिटवर ही जागा दिली जाणार आहे,” असेही अनिल पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
Crime News । अत्याचाराच्या घटनेनं बीड जिल्हा हादरला! एकटेपणाचा फायदा घेत घरात आला आणि…