पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे (Assembly Elections) वारे जोरदार वाहत आहे. या दोन्ही मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान सर्वच प्रमुख पक्षातील राजकीय नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. एकीकडे भाजप तर दुसरीकडे महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये तर प्रचारादरम्यान चांगलीच चढाओढ लागली आहे.
निळू फुले यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर; प्रसाद ओक करणार बायोपिकचं दिग्दर्शन
महाविकास आघाडीतर्फे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (दि.20) कसबा विधानसभा मतदारसंघात बाईक रॅलीचे आयोजन केले होते. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सुद्धा कसब्यात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठक घेत होते. दरम्यान मविआची बाईक रॅली शिंदे यांच्या बैठकीस्थळासमोर येताच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अगदी पेटून उठले होते.
निळू फुले यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर; प्रसाद ओक करणार बायोपिकचं दिग्दर्शन
यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात तुफान घोषणाबाजी केली. यामुळे या परिसरात मोठा गोंधळ पहायला मिळाला. परंतु, वातावरण तंग झालेले दिसताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले व मविआची बाईक रॅली पुढे जाऊ दिली.
एफडी करताय तर थोडं थांबा! ‘या’ आर्थिक गुंतवणुकीत सुद्धा आहेत मोठे तोटे