मुंबई : सलग चार दिवस सुट्ट्यां आल्यामुळे मुंबई-पुणे (Mumbai-Pune) एक्सप्रेसवेवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सलग चार दिवस सुट्ट्या मिळाल्यामुळे पर्यटनासाठी लोक बाहेर पडले आहेत. यामुळे खालापूर टोलजवळ दीड ते अडीच किलोमीटर लांब वाहनांची रांग लागल्याचे दिसत आहे.
शनिवार-रविवारची सुट्टी नंतर स्वातांत्र्यदिन आणि त्याचबरोबर पारशी नवीन वर्ष अशा चार सगळं लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळे लोक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
एक्सप्रेसवेवर आधीच वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. आता त्यामध्ये सलग चार दिवस सुट्ट्या आल्यामुळे त्यात भर पडली आहे. पुण्याच्या अवतीभोवती असंख्य पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासठी पर्यटक घराबाहेर पडत आहेत.