Congress । सध्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections) वारे वाहत आहे. अनेक पक्ष आपल्या उमेदवारांच्या याच्या जाहीर करत आहेत. नुकतीच काँग्रेसने आपल्या उमेदवारांची 8वी यादी जाहीर केली असून त्यात 14 नावांचा समावेश आहे. या यादीत पक्षाने झारखंडमधील 3, मध्य प्रदेशातील 3, तेलंगणातील 4 आणि उत्तर प्रदेशातील 4 जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या विरोधात राव यादवेंद्र सिंह यांना संधी देण्यात आली आहे, तर काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात विदिशामधून प्रताप भानू शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
Navneet Rana । ब्रेकिंग! अमरावतीमधून नवनीत राणा यांना भाजपने दिली उमेदवारी
याच्या एक दिवस आधी 26 मार्च 2024 रोजी काँग्रेसने ‘केंद्रीय निवडणूक समिती’ (CEC) बैठकीत सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची सातवी यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये पाच नावे होती. चार नावे छत्तीसगडमधील, तर एक नाव तामिळनाडूचे होते. छत्तीसगडच्या सुरगुजा (एसटी)मधून शशी सिंह, रायगड (एसटी)मधून डॉ. मै देवी सिंह, बिलासपूरमधून देवेंद्र सिंह यादव आणि कांकेर (एसटी)मधून बिरेश ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे, तर मायलादुथुराई मतदारसंघातून आर सुधा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Baramati News । अभि नवनाथ मदने यांची राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड!