Congress । काँग्रेसला आणखी एक धक्का! अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, पक्षाने जाहीर केली अमरावतीची उमेदवारी

Congress

Congress । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या काँग्रेस आमदाराने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी चे कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. अमरावती विधानसभा मतदार संघातून ही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Daund News । मोठी बातमी! दौंडमध्ये नवे राजकीय समीकरणं; राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यात संघर्षाची शक्यता

त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. सुलभा खोडके या काँग्रेस पक्ष सोडणाऱ्या तिसऱ्या आमदार आहेत. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी नुकताच भाजपमध्ये तर इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सुलभा खोडके यांच्यासह माजी महापौर जफर शेख जब्बार, पदाधिकारी अॅड.शोएब खान, बडनेराचे नगरसेवक अयूब भाई, सचिव आसिफ भाई व इतर स्थानिक नेत्यांनी पक्षात प्रवेश केला.

Ajit Pawar । सर्वात मोठी बातमी! अजित पवार पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर; पाहा कोणत्या नेत्यांना मिळाली संधी

Spread the love