Congress । लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षांतर करत आहेत. तर काही नेते आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या देखील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे आमदार राजू पारवे (Raju Parve) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर राजू पारवे यांनी आमदारकीचा देखील राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसला रामराम ठोकत राजू पारवे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. स्वतः राजू पारवे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना याबाबत माहिती दिली आहे. राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
Sharad Pawar । शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने वेळेवर दिला धोका
माहितीनुसार, राजू पारवे हे शिवसेनेच्या तिकिटावर रामटेक लोकसभेची जागा लढवणार आहेत. त्यांनी याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांनी आपली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचे देखील म्हटल आहे.
Sunil Tatkare । निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरेंची सर्वात मोठी घोषणा!