
Congress । लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर माजी मंत्री बसवराज पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षही होते. मिळालेल्या माहितीनुसार ते मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. बसवराज पाटील हे मराठवाड्यातील मोठे नेते म्हणून ओळखले जातात.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला आहे. यात अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांचा समावेश आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या दोन्ही नेत्यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे राज्यसभा सदस्यत्व जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Ajit Pawar । ब्रेकिंग! अजित पवारांना सर्वात मोठा धक्का; कट्टर समर्थकाने दिला तडकाफडकी राजीनामा
बसवराज पाटील कोण आहेत?
बसवराज पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरूम येथील रहिवासी आहेत. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा निवडून आले. त्यावेळी त्यांना पक्षात चांगले स्थान होते. त्यामुळेच त्यांना त्यावेळी मंत्रीपदाची संधी मिळाली. बसवराज पाटील हे 1999 ते 2004 या काळात महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री होते.