Congress । राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा तणाव आणखी वाढू शकतो. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गुरुवारी (15 फेब्रुवारी) बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला 5 आमदार उपस्थित राहिले नाहीत. यानंतर आता पक्षांतराची अटकळ बांधली जात आहे. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.
firing । गोळीबाराची धक्कादायक घटना! घरासमोरच अंदाधुंद फायरिंग
काँग्रेसच्या बैठकीला अस्लम शेख (मालाड पश्चिम), अमित देशमुख (लातूर शहर), सुलभा खोडके (अमरावती), मोहन हंबर्डे आणि नुकतेच राजीनामा दिलेले बाबा सिद्दीकी यांचे पुत्र जीशान सिद्दीकी (वांद्रे पूर्व) हे उपस्थित नव्हते. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, त्यांची परवानगी घेऊन हे पाच आमदार बैठकीला अनुपस्थित राहिले. काँग्रेसचे महाराष्ट्र युनिट अध्यक्ष नाना पटोले यांनीही सांगितले की, या आमदारांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे बैठकीला न येण्याची परवानगी मागितली होती. या बड्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी याबाबत अनेक वेगेवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. बैठकीला उपस्थित नसलेले हे ५ नेते काँग्रेसला सोडणार का? अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.