Congress । लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का

Congress

Congress । मागच्या काही दिवसापासून काँग्रेसला अनेक धक्क्यावर धक्के बसत आहेत. सध्या देखील लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Politics News । सातारच्या राजकारणातून समोर आली सर्वात मोठी बातमी

रश्मी शुक्ला यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने काँग्रेस समोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यावर हायकोर्टामध्ये याचिका देखील दाखल झाली होती. या याचिकेवर मंगळवारी कोर्टाने सुनावणी दिली यावेळी रश्मी बर्वे यांना दिलासा देखील दिला होता. मात्र आज जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र रद्द केल्याची माहिती मिळत आहे.

Raigad Lok Sabha । खासदार सुनील तटकरेंना धक्का; रायगड लोकसभेवर भाजपचा दावा

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा निर्णय समोर आल्याने आता बर्वे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मोठी अडचण झाली आहे.

Aditya Thackeray । आदित्य ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का

Spread the love