Congress । काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! सहा आमदार अपात्र, विधानसभा अध्यक्षांची मोठी कारवाई? राजकारणात मोठी खळबळ

Congress

Congress । हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे (Congress ।) सरकार बहुमत असूनही राज्यसभेची जागा भाजपकडे (BJP) गेल्याने राजकीय गोंधळ उडाला आहे. दरम्यान, काँग्रेसविरोधात मतदान करणाऱ्या ६ बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी या सहा बंडखोर काँग्रेस आमदारांचे सदस्यत्व रद्द केले आहे. विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी या आमदारांच्या भवितव्याचा निर्णय जाहीर केला.

Rohit Pawar । रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर सर्वात गंभीर आरोप; म्हणाले, “आमच्या काकांनी देखील…”

हिमाचल विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप पठानिया यांनी त्यांना पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. काल दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी निर्णय राखून ठेवला होता. काँग्रेसचे आमदार आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत सहा आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती.

Sushma Andhare । श्रीकांत शिंदे यांच्याबाबत सुषमा अंधारे यांचे सर्वात मोठे वक्तव्य; म्हणाल्या, “त्यांना फक्त…”

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी अपात्र ठरविलेल्या सहा बंडखोर आमदारांमध्ये राजेंद्र राणा, रवी ठाकूर, चेतन शर्मा, आयडी लखनवाल, सुधीर शर्मा आणि देवेंद्र भुट्टो यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोर आमदार हिमाचल विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात जाऊ शकतात. विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, मी सर्वांची बाजू ऐकून घेतली आहे.

Jarange Patil । ब्रेकिंग! जरांगे पाटील जालन्यातून निवडणूक लढवणार? वंचितची नेमकी मागणी काय?

आमदारांनी व्हिपचे उल्लंघन केले. सर्व 6 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहे. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्यात येत आहे.

Narendra Modi । नरेंद्र मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका; म्हणाले, “त्यावेळी कृषीमंत्री…”

Spread the love