Congress । चंद्रपुरात काँग्रेसचा उमेदवार ठरला! वडेट्टीवार नाही तर सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात लढणार ‘हा’ उमेदवार

Congress

Congress । केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुका (Loksabha election) जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी (Loksabha election candidates list) जाहीर करत आहे. राजकीय पक्ष निवडणुकीत बड्या नेत्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देत आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करताच काँग्रेसने देखील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. (Latest marathi news)

Topers Ad

JP Nadda | धक्कादायक बातमी! भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला

काँग्रेसने चंद्रपुरात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) या वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकरांचे पती बाळू धानोरकर यांचा चंद्रपूर मतदारसंघातून विजय झाला होता. राज्यातून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकलेले ते एकमेव खासदार होते. (Sudhir Mungantiwar vs Pratibha Dhanorkar)

Solapur Politics News । राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे, सोलापूरच्या राजकारणात हाय व्होल्टेज सामना

दरम्यान, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्या नावाची चर्चा सुरु होती. अशातच विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा सोशल मीडियावरून व्यक्त केली होती. पण काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या जग्गी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिले आहे.

Bjp । भाजपकडून ‘या’ बड्या नेत्याचा पत्ता कट; उमेदवारी देणं टाळलं

Spread the love