Congress । महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघाचे काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी अजित पवार गटात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला असताना, हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का ठरणार आहे.
Sanjay Raut । शिंदे पिता-पुत्रांबद्दल बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली..!
झिशान सिद्दिकी हे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे पुत्र असून, 2019 च्या निवडणुकीत त्यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव केला होता. झिशान सिद्दिकी हे युवा आणि प्रभावी नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखालील मुंबई युवक काँग्रेसने अनेक महत्त्वाच्या उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे, त्यामुळे त्यांचा अजित पवार गटात जाण्याचा अंदाज काँग्रेससाठी चिंतेचा विषय आहे.
अजित पवार गटाच्या ‘जनसन्मान यात्रा’ अंतर्गत, नवाब मलिक यांच्या चेंबूर मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात झिशान सिद्दिकी सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. या यात्रेत त्यांचा सहभाग हा पक्षांतराच्या संकेतांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो.
Bjp । मोठी बातमी! राज्यात भाजपला मोठा धक्का!
यापूर्वी, झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनीही काँग्रेस सोडून अजित पवार गटात प्रवेश केला होता. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झिशान सिद्दिकी यांचा निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात याबद्दलच्या चर्चा जोर धरत आहेत.