Congress | राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केल्याचे पहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर आचारसंहिता देखील लागू झालेल्या आहेत आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. अशातच आता काँग्रेसला खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Politics News | ब्रेकिंग! महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप? राज ठाकरे दिल्लीला रवाना
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या पक्षाला राम राम ठोकण्याच्या तयारीत आहे, असे बोलले जाते आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्यांमध्ये वाढ होत आहे. सहाजिकच याचा परिणाम आगामी निवडणुकीवर झालेला आपल्याला पाहायला मिळेल.सुत्रांच्या माहितीनुसार, प्रिया दत्त यांनी शिवसेनेत सामील सहभागी व्हावे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनापासून इच्छा आहे.
Ajit pawar । “अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, पण…” बड्या नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ
प्रिया दत्त यांना लोकसभेचे तिकीट मिळणे अवघड आहे. पण त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेचे तिकीट मिळू शकते. प्रिया दत्त या दिवंगत अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांच्या कन्या आहेत. तसेच त्या अभिनेते संजय दत्त यांच्या भगिनी देखील आहेत. काँग्रेसने दिलेल्या उत्तर पश्चिम मुंबईतून उत्तर पश्चिम मुंबईतून झालेल्या पोट निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या.
Viral Video । ऋषिकेशमध्ये प्री-वेडिंग शूट करणं जोडप्याला पडलं महागात… घडलं भयानक, पाहा Video