Congress । सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. जागावाटपावर देखील भर दिला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीत जागा वाटपावरून मतभेद असून हा वाद चव्हाट्यावर येत असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकांची तयारी सुरू असतानाच आता काँग्रेसचा मुंबईतील बडा नेता नाराज असून लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Congress leader Milind Deora) पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काँग्रेसला राम राम ठोकून मिलिंद देवरा हे शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. त्यामुळे जर मिलिंद देवरा यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल असे म्हटले जात आहे.
Maratha Reservation । बिग ब्रेकिंग! जरांगेंच्या मुंबईतील सभेबाबत उच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं
येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मिलिंद देवरा हे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण मुंबई मतदार संघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा हे काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
जर काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे शिवसेनेमध्ये आले तर मुंबई मतदार संघासाठी शिंदे गट हा आग्रही असू शकतो. मात्र भाजप हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. यामुळे पुढील काळात भाजप आणि शिंदे गटात दक्षिण मुंबई मतदारसंघावरून संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Supriya Sule । प्रकाश आंबेडकरांशी युती करण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य