Congress । राजकारणातून मोठी बातमी! काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

Congress

Congress । राज्याचे राजकारण आगामी निवडणुकीवरून (Loksabha election) तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातले दोन मोठे पक्ष फुटल्याने जनता कोणाला निवडून देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राजकीय पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहे. अशातच काँग्रेसला खूप मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.

Crime News । भांडण मिटवण्यासाठी दोघांनी केले दारू पार्टीचे आयोजन, मात्र पुढे जे घडले ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) जाहीर प्रवेश केला आहे. राजू वाघमारे दीर्घकाळापासून काँग्रेसचे प्रवक्ते होते. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटात प्रवेश करताना राजू वाघमारे म्हणाले की, काही ठराविक नेत्यांच्या हाती काँग्रेस दडलेली आहे, अशी जहरी टीका वाघमारे यांनी केली आहे.

Maharashtra Politics । तटकरेंनी फोडले शरद पवारांचे घर, आव्हाडांच्या आरोपावर अजित पवार गटाचे प्रत्युत्तर

सध्या लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत. आणि या निवडणुकीच्या तोंडावरच राजू वाघमारे यांनी काँग्रेसची साठी सोडली आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलेल जात आहे.

Supriya Sule । बारामतीत नागरिकांना धमकावलं जातंय! सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

Spread the love